HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार, पुणे पोलिसात तक्रार दाखल

पुणे | पुण्यातील भाजपच्या माजी आमदार आणि नेत्या मेधा कुलकर्णी यांच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा सुद्धा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील रामबाग कॉलनीमध्ये एका ठिकाणी अनधिकृतपणे उसाचा गुऱ्हाळ सुरू आहे. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी याबद्दल तक्रार केली होती.

कोथरुड भागातील रामबाग कॉलनीत असलेल्या अनधिकृत जागेत ऊसाचे गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचा दावा गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र आता कुलकर्णींवरच मारहाणीचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काय आहे प्रकरण?

जाब विचारल्याच्या रागातून जून २०२० मध्ये पुण्यात कोथरुड परिसरातील सहजानंद सोसायटीजवळ दारु पिण्यास बसलेल्या युवकांनी मेधा कुलकर्णींसह तिघांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. दारुड्यांनी सुरुवातीला सहजानंद सोसायटीतील रहिवासी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला होता.

विलास कोल्हे कुत्र्याला घेऊन बाहेर गेले होते. त्यावेळी दारुड्यांनी आमच्यावर कुत्रा का सोडता, असं विचारत मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार मेधा कुलकर्णी घटनास्थळी आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला होता. हल्ल्यात कुलकर्णी यांना दुखापत झाली होती आणि त्यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड – कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

News Desk

खुशखबर…१ जानेवारीपासून लागू होणार सातवा वेतन आयोग

News Desk

मंत्रालयातून इमारतींंचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग – आशिष शेलार

News Desk