HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यविरोधात पोस्ट लिहणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍या महिले विरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात होती. तर उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून मौलवी झाल्याचे दाखवण्यात आला होता. या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप वकील धरम मिश्रा यांनी केला आहे. काही पोस्टमध्ये तर अतिशय खालच्या भाषेचा वापर केला गेला होता तर काहींमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख सुद्धा केला गेला. या सगळ्याच्या विरोधात शिवसैनिकांनमध्ये तीव्र नाराजी होती आणि त्याचे प्रतिसादही उमटत होते.

नालासोपारा मधील युवा सेनेचे विभाग अधिकारी रोहन चव्हाण यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात महिलेला अटक झाली असून तिला जामीनावर सोडण्यात आले आहे. सायबर विभाग ट्विटर अकाउंट मॉनिटर करत आहे आणि अकाउंटची पडताळणी करून सायबर विभागाकडून पुढील तपास करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला !

News Desk

अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची मोठी चूक! – शरद पवार

Aprna

मराठा आंदोलक आक्रमक, ‘महाराष्ट्र बंद’ची दिली हाक

News Desk