HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याने कंगनाविरोधात गुन्हा दाखल!

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानांवरून शिवसेनेनं टीका केली होती. त्यानंतर हा वाद चिघळत गेला. यात महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग पाडल्यानंतर तिने संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख तीने एकेरी भाषेत केल्यामूळे कंगनावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.

कंगनानं केलेल्या या टीकेवर नाराजी व्यक्त होत असताना मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नितीन वसंत माने असं तक्रार देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तसेच, दुसरा गुन्हा दिंडोशीयेथे दाखल करण्यात आला आहे. कंगनाने सेनेला निशाणा करत टीकेची झोड उठवली होती त्यावरुन आथा तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षपूर्तीच्या आनंद संपायच्या आत काँग्रेसचे इशारे सुरू, भाजपचा टोला

News Desk

अर्णब गोस्वामींसाठी आता देवेंद्र फडणवीसही मैदानात, कोर्टाने अर्णब यांना दिलेल्या वागणूकीची दखल घ्यावी

News Desk

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय केला रद्द …

News Desk