मुंबई। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपजाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज (३० नोव्हेंबर) सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात येणार आहे. महाविकासाआघाडीने जवळपास १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Confidence vote of Chief Minister Uddhav Thackeray led Maha Vikas Aghadi Government to be held later today in Maharashtra assembly. (file pic) pic.twitter.com/AQQg5gtRVl
— ANI (@ANI) November 30, 2019
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार आहे. आज कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय देण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. उद्या (१ डिसेंबर) रविवारीही विधानसभा सुरू राहणार असून या दिवशी अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
१६२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचा दावा आहे की, त्यांच्याकडे १६२ आमदारांचा पाठिंबा आहे. २८८ जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा १४५आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६,राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तिन्ही पक्षांचे संख्याबळ १५४ होते. म्हणजेच तिन्ही पक्ष मिळून सहज बहुमत सिद्ध करु शकतात. याशिवाय काही अपक्ष आणि इतर आमदारांचाही महाविकासआघाडीला पाठिंबा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.