मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या सत्रातील कार्यकाळाला आज (३० मे) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी जनतेला पत्र लिहून त्यांनी वर्षभरात विविध कामांची आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. मोदींच्या वर्षपूर्तीवर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या वर्षभरा केलेल्या कार्याचे अभिनंदन केले. यात महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मोदींच्या वर्षपूर्तीला ट्वीट करत अभिनंदन केले आहे.
He developed relation with many nations which will hopefully help now in #CoronaPandemic when economic reforms of nation are to be rejuvenated..
I strongly believe he can do it.#1YearOfModi2— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 30, 2020
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता पंकजा मुंडे यांनी मोदींच्या वर्षपूर्तीला अभिनंदन केल्याने पुन्हा एकाद राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या, “मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या वर्षपूर्तीला अभिनंदन करते. गेल्या पाच वर्षात मोदींनी चौकटीत न बसणारे निर्णय घेतले आहे. तरी देशातील जनतेने त्यांचे समर्थन केले आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच मोदींनी जगभरातील देशांशी जे नाते जोडले गेले आहे. याचा फायदा आपल्याला कोरोनासारख्या माहामारीत होईल. जेणेकरून देशाची आर्थिक स्थिती आणि विकास होण्यास मदत होईल, असे त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहे.
पंकजा मुंडेंची पक्षावर नाराजी
पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाला होता. यानंतर पंकजा मुंडेंना विधानपरिषदेच्या उमेदवारी मिळण्याची पक्षाकडून अपेक्षा होती. मात्र, पंकजा मुंडेंना डावलून नवी लोकांना संधी देण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांना महाराष्ट्र भाजपवर नाराज आहेत हे सातत्याने दिसून येत आहे. महाराष्ट्र भाजपने महाविकासआघाडी सरकराविरोधात महाराष्ट्र बचावो आंदोलन केले पण पंकजा मुंडेच सोडून भाजपचे सर्व नेते या आंदोलनात सहभागी झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.