HW News Marathi
Covid-19

आता १० अंकांचा मोबाइल ११ अंकी करण्याच्या ट्रायने दिल्या सूचना

मुंबई | टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने काल (३० मे) प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, देशामध्ये आता ११ अंकाच्या मोबाईल नंबर वापर करण्याच्या सुचना देण्यात आला आहे. , १० अंकाच्या मोबाइल नंबरला ११ अंकाच्या मोबाइल नंबरमध्ये बदलल्यास देशात जास्त नंबर उपलब्ध होऊ शकतात, अशी माहिती ट्रायने दिली आहे.

मोबाइल नंबरचा पहिला अंक जर ९ ठेवला तर १० ते ११ अंकाच्या मोबाइल नंबरवर स्विच होण्याने देशात एकूण १० बिलियन (१०० कोटी) नंबर्सची क्षमता वाढेल. देशात सध्या १० आकड्यांचे २१० कोटी कनेक्शन आहेत. जे ७, ८ आणि ९ नंबरने सुरु होतात. ट्रायने म्हटले, फिक्स्ड नेटवर्कमधून मोबाइलवर कॉल करण्यासाठी शून्य वापरणे अनिवार्य झाल्यानंतर २, ३, ४ आणि ६ स्तरावर फ्री सब-लेवल्स मोबाईल नंबर म्हणून वापरता येऊ शकतात.

याशिवाय ट्रायने नवीन राष्ट्रीय नंबर योजना सुचवली आहे. ही योजना लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. डोंगल वापरणाऱ्यांसाठी १३ तर मोबाईल धारकांसाठी ११ अंकी नंबर असेल, असेही ट्रायने म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खतांच्या वाढत्या किमती विरोधात बच्चू कडू करणार टाळी आणि थाली बजाओ आंदोलन !

News Desk

विद्यापीठ आणि महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव! – उदय सामंत

Aprna

‘देशातलं आरोग्यखातं अपयशी,गडकरींकडे सुत्र सोपवा’ शिवसेनेचा गडकरींना पाठिंबा !

News Desk