HW News Marathi
Covid-19

शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

मुंबई । “आंतरराष्ट्रीय पातळीवर खतासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४,७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या जुन्याच भावाने हे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (१९ मे) घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र भाजपकडून आम्ही मोदींचे हार्दिक अभिनंदन करतो”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले !

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रासायनिक खतांसाठी आणखी १४,७७५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी १४० टक्के वाढली असून आता शेतकऱ्यांना डीएपी खताची गोणी गेल्या वर्षीच्याच म्हणजे १२०० रुपये भावाने मिळेल. मा. नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याच पद्धतीने आजचा स्वागतार्ह निर्णय आहे.”

मोदी सरकारने वाढीव किंमतीचा बोजा स्वतःवर घेतला !

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतासाठी लागणाऱ्या फॉस्फरिक ॲसिड, अमोनिया या रसायनांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे खत कंपन्यांनी भारतात रासायनिक खताच्या किंमतीत वाढ केली. परंतु, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हा खताच्या किंमतीचा वाढीव बोजा झेपणारा नव्हता. खतांच्या किंमती परवडण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने अनुदान द्यावे, अशी विनंती आम्ही केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायनेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर आजचा झालेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. सरकारने वाढीव किंमतीचा बोजा स्वतःवर घेतला आहे”, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही, राज ठाकरेंचा टोला

News Desk

MPSC परिक्षा कधी होणार ? मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

News Desk

किराणा दुकानांच्या वेळेत पुन्हा बदल?, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

News Desk