HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नातून बाहेर या, वास्तव स्विकारा! फडणवीसांना काँग्रेसचा खोचक सल्ला

मुंबई । “भारतीय जनता पक्ष सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेलं नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्वीकारलंच पाहिजे”, असा खोचक सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

“मला आजही वाटतं मीच मुख्यमंत्री आहे”, असं फडणवीस मंगळवारी (१२ ऑक्टोबर) एका कार्यक्रमात म्हणाले होते. तोच धागा पकडून काँग्रेसकडून हा निशाणा साधण्यात आला. “फडणवीस यांना सत्तेचा मोह सुटलेला दिसत नाही. सत्ता हातातून जात आहे असं दिसताच त्यांनी पहाटेचा प्रयोग करुन पाहिला पण त्याचं ते मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचं ठरलं. त्यानंतरही सतत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा घोषा लावत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही”, अशी बोचरी टीका अतुल लोंढे यांनी केली.

आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस!

“मविआचं सरकार आज पडणार, उद्या पडणार या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार काही जात नाही उलट ते आजही भक्कम आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस दिसतो. त्यांनी स्वप्नातून बाहेर पडावं आणि आपण सध्या मुख्यमंत्री नाही तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहोत हे वास्तव स्विकारावं”, असा सल्ला काँग्रेसने दिला आहे.

भाजपतील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी बोध घ्यावा!

“भारतीय जनता पक्षात कोणाला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर कोणाला आपलाच नंबर आहे असं वाटतं पण देवेंद्र फडणवीस तर स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपतील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते. त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावं”, अशी कोपरखळीही काँग्रेसकडून मारण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी २ मुख्यमंत्र्याच्या गावी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपचं खिंडार

News Desk

‘फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार’ मोठ्या नेत्याने केलं विधान !

News Desk

काँग्रेस सोडून जाणारे NSUI ,Youth congress अशा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतून तयार झाले नाहीत – सत्यजित तांबे

News Desk