HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांच्या काळात RSS ला किती टक्केवारी दिली? नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल!

मुंबई | राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजप नेते आक्रमक झाले असून राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज (२४ मार्च) राज्यपालांची भेट घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसवर टीका करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे अशी टीका केली. तसंच फोन टॅपिंगच्या या प्रकरणात काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही म्हटलं. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो असा टोला भाजपला लगावला. “वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

“या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचं सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंग कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचं सांगत असतील तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपवाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती,” असं नाना पटोले यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून वंचीत भारतीय, महागाई मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही व्यूहरचना रचल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

“महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना अजूनही केंद्राकडे अपुऱ्या पद्धतीने लस पुरवली जात आहे. एकीकडे केंद्रातील सरकार पाकिस्तान धार्जिणी होऊन पाकिस्तानला लस पुरवतं, पण महाराष्ट्राला आणि देशातील गरीबाला लस दिली जात नाही. या मूळ प्रश्नांवरुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु असून राज्य सरकारने हे गांभीर्याने घ्यावं अशी काँग्रेसची भूमिका राहणार आहे,” असं नाना पटोले यांनी सांगितलं. “राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून राजभवन भाजपा कार्यालय झालं आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेतला आहे त्यासाठी जनता माफ करणार नाही,” असं नाना पटोले यांनी म्हटलं.

“फडणवीस स्वत: न्यायाधीश झाले होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाही? राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणं चुकीचं आहे. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका आहे. आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्यासाठी चांगले झाले,” अशी टीका नाना पटोले यांनी केली. “परमबीर सिंग दोषी आहेत की अनिल देशमुख हे तपासावं लागलं. फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत होते,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मनमोहन सिंग बोलत नव्हते तेव्हा न बोलणारे पंतप्रधान अशी टीका झाली. आता बोलका पंतप्रधान भेटल्यानंतर देशाचं काय झालं पाहिलं ना…फडणवीस मुख्यमंत्री असताना तेच बोलत होते….तेच प्रवक्ते, मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंचा तो स्वभाव नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. विरोधी पक्षनेत्याने सांगावं आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावं असं काही धोरण केंद्राने ठरवलं आहे का ? लोकशाहीत प्रत्येकाचा वेगळा स्वभाव असतो. फडणवीस न्यायाधीश आणि प्रवक्त्यांची भूमिका निभावत होते..तो त्यांचा प्रश्न होता”.

“मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंग यांना निलंबित केलं असतं. त्यांनी आता सुप्रीम कोर्टात जावं की हायकोर्टात जावं हा त्यांचा प्रश्न आहे. मोहन डेलकर प्रकऱणानंतर हे सगळं सुरु झालं. अजूनही चौकशी सुरु नाही.. आम्ही दबाव आणला. हे आयुक्त गुन्हे दाखल होणार नाही सांगत होते. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी या पद्दतीने वागणारे अधिकारी असतील तर मी राहिलो असतो तर बदली केली नसती निलंबितच केलं असतं,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते देवेंद्र?

गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातील मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे. शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला,” असंही फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, “काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलतायत. इथले नेते वेगळं बोलतायत. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही,” असा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला. पुढे बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसला सवाल विचारताना, काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे असं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव असून केंद्रसरकार नेमकं काम कुणासाठी करतंय – छगन भुजबळ

News Desk

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवण्याची शक्यता

News Desk

‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोला

Aprna