नाशिक | महाविकास आघाडी सरकरामध्ये पुन्हा एकदा नाराजी असल्याचे दिसून आले आहे. आघाडी सरकारमधील कॉंग्रेस पक्षाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते.
कोरोनामुळं राज्य सरकार आर्थिक अडचणीत आलं आहे. राज्याचे आर्थिक स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याला पगारांसाठी दर महिन्याला १२ हजार कोटींचं कर्ज काढावं लागत आहे. मात्र, राज्य सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच, वाढीव वीज बिलासंदर्भात माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले होते की उर्जामंत्री नितीन राऊत वीज बिल माफीसाठी तयार आहेत पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळे हे अडत आहे.
महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या मुद्दयावरुन बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे
. “ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सध्या वीजबिलांवरुन मोठं राजकारण रंगलं आहे. भाजपसह विरोधकांनी आकडेवारी सादर करुन, सत्ताधारी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. बावनकुळेंच्या आकडेवारीचा आधार घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्याला थोरात यांनी उत्तर दिलं.
दरम्यान, बाळासाहेब थोरात असेही म्हणाले की, “लॉकडाऊनकाळात आलेल्या वीजबिल तक्रारी उर्जामंत्र्यांनी सोडविल्या आहे. नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत”भाजपकडून आज समतेचे, राज्य घटनेचे मूलतत्त्व छेद देण्याचं काम सुरु आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस सूडबुद्धीने आहे का ? याबद्दल माहिती नाही, असं थोरात यांनी नमूद केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.