HW News Marathi
देश / विदेश

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारसाठी काँग्रेस नेते दिल्ली दाखल, पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा

नवी दिल्ली। नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तारकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळी आज (२३ डिसेंबर) दिल्लीतील काँग्रेसचे अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असून मंत्रिमंडळाच्या विस्तारात काँग्रेसच्या वाटेला किती आणि कोणते खाते कोणत्या नेत्याची वर्णी लागेल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल (२२ डिसेंबर) नेते दिल्लीत दाखल झाले आहे. आज पक्षश्रेष्ठींची चर्चा करणार आहे.

प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांनीही दिल्ली गाठली आहे. महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांसह नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आता दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना वगळून नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या आमदारांची नावे चर्चेत आहेत.

काँग्रेसकडे कोणती खाती येण्याची शक्यता?

सध्या महसूल मंत्रालयाची धुरा बाळासाहेब थोरातांकडे असून हे मंत्रिपद त्यांच्याकडे कायम राहण्याचे संकेत मिळाले आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रिपदी यशोमती ठाकूर किंवा वर्षा गायकवाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची मंत्रालये कोणाकडे जाणार, याची उत्सुकता आहे.

एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सहा मंत्र्यांनी २८ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच १२ डिसेंबरला हिवाळी अधिवेशना तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी लागणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कमल हासन यांना गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल | हिंदू महासभा

News Desk

मुख्यमंत्र्यांचाही फोन कुणी टॅप केला तर आश्चर्य वाटणार नाही , संजय राऊत

News Desk

PMLA कायद्यातील ईडीचे अधिकार अबाधित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna