HW News Marathi
महाराष्ट्र

जर काँग्रेसचे विचार स्वीकारुन खडसे आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु

मुंबई | येत्या २१ मेला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. आणि यावेळी भाजपने निष्ठावंत आणि जुने नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी न दिल्याने खडसेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहेच. मात्र, आता कॉंग्रेस पक्षाकडून त्यांना खुली ऑफर महसूल मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे हे एक समर्थ नेते आहेत. त्यांना मी १९९० सालापासून आम्ही एकत्र विधानसभेत आहोत.कधी ते मंत्री राहिले कधी मी मंत्री राहिलो. नाथाभाउंचे काम एक विरोधी पक्षनेते म्हणून एक समर्थक नेते म्हणून आहे. खडसे हे जनमानस असलेला नेता आहेत.

जर काँग्रेसचे विचार स्वीकारुन ते आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु”, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगत खडसेंना कॉंग्रेसची दारे खुली करुन दिली आहेत. त्यामूळे आता खडसे भाजप सोडून कॉंग्रेसची ही ऑफर स्विकारणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अकृषिक करास तात्पुरती स्थगिती! – बाळासाहेब थोरात

Aprna

पंढरपूरची निवडणूक ठरली घातक! गावागावांत रुग्णांचे मृत्यू, हॉस्पिटल्सही भरले

News Desk

या दिग्गजांनी चुकवला वाहतुकीचा दंड

News Desk