HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन पायलट यांचं समर्थन केल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा नेता निलंबित !

मुंबई | राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन काल (१४ जुलै) सचिन पायलट यांची हकालपट्टी केली इतकेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष पद देखील काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता सचिन पायलट यांचे समर्थन करणाऱ्या एका काँग्रेस प्रवक्त्याला निलंबित केले आहे. काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून निलंबित केले आहे.

पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते टीव्हीवरील एका चर्चासत्रात काँग्रेसवरच टीका करताना दिसले आणि त्यामुळे त्यांना हटवण्यात आले.

पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन काढून टाकल्यानंतर झा यांनी ट्विट केले होते. ” २०१३ ते २०१८ ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम दिले. काँग्रेस २१ जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून १०० वर परत आली. मात्र आम्ही त्यांना नुकताच कामगिरीचा बोनस दिला. आम्ही किती गुणग्राहक आहोत. आम्ही खूप पारदर्शक आहोत.” असे उपरोधक ट्वीट त्यांनी केले होते. त्यानंतर एका वाहिनीवरील चर्चेत त्यांनी पुन्हा स्वपक्षावर हल्लाबोल चढवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणार! – अब्दुल सत्तार

Aprna

फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्यावा! – रामदास आठवले

Aprna

सत्तेत येण्यासाठी आम्ही अनेक आश्वासने दिली | गडकरी

swarit