नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे काँग्रेस पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधी यांना रोखण्यात आले होते. त्याचप्रमाणे, तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर आज (३ ऑक्टोबर) दुपारी पुन्हा राहुल गांधी हाथरसला जाणार आहेत.दरम्यान, थोड्याच वेळात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हासरथमध्ये दाखल होतील.
If not this time, then we will try again: Congress leader Priyanka Gandhi Vadra on her way to meet the family of the alleged gangrape victim in #Hathras (UP), with Congress leader Rahul Gandhi https://t.co/Ryl2nd1dGB pic.twitter.com/zLPOecfhGd
— ANI (@ANI) October 3, 2020
“जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून आणि त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही”, असा इशारा यावेळी राहुल गांधी यांनी दिला आहे. “पीडित मुलीच्या कुटुंबासोबत उत्तर प्रदेशचे पोलीस व प्रशासन ज्या पद्धतीने वागत आहे ते मला कदापि मान्य नाही. कोणत्याही भारतीयाने आशा पद्धतीची वागणूक सहन करू नये, स्वीकारु नये”, असेही राहुल गांधी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज दुपारी जेव्हा पुन्हा हासरथला रवाना होतील तेव्हा त्यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य काही खासदारदेखील असतील. थोड्याच वेळात हे दोन्ही नेते पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.