HW News Marathi
Covid-19

काँग्रेस नेते राजीव सातव ICU मध्ये, प्रकृती स्थिर; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई । काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये ICU विभागात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. खरंतर आज (२९ एप्रिल) सकाळी मिळालेल्या माहितीनुसार राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याहून मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात येणार होते. मात्र, सध्या सातव हे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये ICU विभागातसाच असून प्रतिसाद देत असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली

पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, राजीव सातव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर ICU विभागात उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत, महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्समधले डॉक्टर शशांक जोशी, राहुल पंडित हे स्वतः राजीव सातव यांच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील रुग्णालयात तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राजीव सातव यांना २२ एप्रिलला कोरोनाची लागण

राजीव सातव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. सातव यांनी ट्विटरवरुन स्वतः याबाबतची माहिती दिली होती. “आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घ्यावी”, असे आवाहन सातव यांनी केले होते. मात्र, २ दिवसांपासून सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यानंतर, प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने सातव यांना आता मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात येणार होते. मात्र, अद्यापपर्यंत असा निर्णय झाला नसून ते ICUमध्ये आहेत व प्रकृती स्थिर आहे अशी अधिकृत माहिती मिळते.

राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी

राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे, सध्या सातव यांच्या प्रकृतीविषयक सर्व बाबींकडे राहुल गांधी स्वतः लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बच्चन कुटुंबानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव…

News Desk

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ हजारांच्या पार, मृत्यूंच्या संख्येनेही ओलांडला एक हजाराचा टप्पा

News Desk

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम

News Desk