HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन 

सातारा | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. विलासकाकांनी त्यांनी सलग ३५ वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आज (४ जानेवारी) दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत विलासकाका पाटील उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विलासकाकांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी १२ वर्षे विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळून महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. उंडाळकर यांचे सहकारी क्षेत्रातही मोठे काम आहे. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहाकरी संस्था उभारल्या. त्यांच्या जाण्याने कराड, साताऱ्यासह संपूर्ण राजकीय वर्तृळातून त्यांच्या जाण्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत विलासकाका उंडाळकर ?

काँग्रेसी विचारधारेशी एकनिष्ठ असलेला नेता अशी उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या सर्व क्षेत्रात त्यांनी चांगले काम करुन महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला.

विलासकाका उंडाळकर तब्बल ७ टर्म म्हणजेच सलग ३५ वर्षे माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’

News Desk

किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण!

News Desk

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …! – चंद्रकांत पाटील

Aprna