HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण!

मुंबई। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महा विकास आघाडी विरुद्ध विरोधक असाच सामना रंगला आहे. अर्थातच भाजपकडून वारंवार ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. यात विशेषतः माजी मंत्री आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे आघाडीवर असतात किरीट सोमय्या वारंवार आघाडीतल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत टीका करत असतात. आणि या सोबतच अनेक ठिकाणी जाऊन मालमत्तांची पाहणी देखील किरीट सोमय्या यांच्याकडून केली जात असतानाच, आता देखील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाला तब्बल 300 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कथित घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. सोमय्यांनी आता नांदेड आणि धर्माबादला जाण्याचा इशाराच दिला आहे.

खळबळजनक दावाही सोमय्यांनी केला

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच ठेवणारे भाजप नेते किरीट सोमय्या दिवाळीनंतर शांत होते मात्र आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आता किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण आहेत. यावेळी सोमय्या म्हणाले की, आयकर खात्याने आज पुन्हा नांदेड, धर्माबाद शाखेत छापा मारला आहे. अशोक चव्हाण कुटुंबाला 300 कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असा खळबळजनक दावाही सोमय्यांनी केला. याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण नांदेड, धर्माबादला जाणार आहोत. बुलढाणा अर्बन नागरी पतपेढीचा दुरुपयोग झाला आहे, असा आरोपही सोमय्यांनी केला.

दिवाळीआधी किरीट सोमय्यांच वक्तव्य

किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस दलाच्या अत्याधुनिक कार्यपद्धतीमुळे जनमानसात पोलीसांप्रति विश्वासार्हता! – जयंत पाटील

Aprna

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध – छगन भुजबळ

News Desk

दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

swarit