नवी दिल्ली | एकाबाजूला देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच देशात पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी या राज्यांच्या निवडणुकांसह अनेक लोकसभा व विधानसभांच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल आज (२ मे) जाहीर होणार असून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये प्रमुख चुरस निर्माण झाली असून या राज्याच्या निकालांना अधिक महत्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, आज (२ मे) टीव्ही वर होणाऱ्या डिबेट शो मध्ये तुम्हाला काँग्रेसचा एकही प्रवक्ता दिसणार नाही. देशात सध्या कोरोना व्हायरसमुळे गंभीर स्थिती आहे. त्यामुळे निवडणुकी संदर्भातील टीव्ही डिबेट शो मध्ये पक्षाचा एकही प्रवक्ता सहभागी होणार नाही, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले आहे. ‘सध्या देश अभूतपूर्व अशा संकटाचा सामना करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार दिशाहीन झाले आहे. अशावेळी निवडणुकीतील जय-पराजयाबद्दल चर्चा करण्याऐवजी आमचे प्रवक्ते निवडणूक डिबेट शो मधील चर्चेत सहभागी होणार नाहीत’ अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टि्वट करुन दिली आहे.
प्रसारमाध्यमांमधील मित्रांना हव्या असलेल्या कुठल्याही प्रतिक्रियेसाठी आम्ही उपलब्ध आहोत. आम्ही जिंकू किंवा हरु, पण या प्रसंगी लोक ऑक्सिजन, बेड्स, औषधं आणि व्हेंटिलेटर्ससाठी फिरत आहेत. त्यांच्यापाठिशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे’ असे मत त्यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये मांडले आहे. तसेच, महाराष्ट्र कॉंग्रेसनेही अशीच भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कोरोनाची भीषण परिस्थिती बघता आज होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या चर्चेमध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून कोणीही सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
At a time when Nation is facing an unprecedented crisis, when Govt under PM Modi has collapsed, we find it unacceptable to not hold them accountable & instead discuss election wins & losses.
We @INCIndia have decided to withdraw our spokespersons from election debates.
1/2— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 1, 2021
दरम्यान कोरोनाच्या या भीषण परिस्थितीशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तज्ज्ञांसोबत महत्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये ते देशात गंभीर रुप घेतलेल्या कोरोनाला कसे रोखायचे, संकटाची व्याप्ती, देशभरातील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा, रेमडेसीवीर तुटवडा आदींबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. तसेच देशातील कोरोना योद्ध्यांच्या म्हणजेच मनुष्यबळावर देखील चर्चा करणार आहेत.
2/2
We shall remain available for any comment that media friends want.We may win, we may lose, but at a time when people are looking for oxygen, beds, medicines, ventilators; our duty tells us to stand by them, work with them to heal & help.
In solidarity with India.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.