HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ११,९२९ सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई | देशात गेल्या २४ तासांत ११ हजार ९२९ कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात देशात ३११ सर्वाधिक कोरोनामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग चौथ्या दिवशी ३०० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचे बळी गेले आहेत. तर एका दिवसात ८ हजार ५० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २० हजार ९२२ वर पोहोचली आहे. सध्या देशात १ लाख ४९ हजार ३४८ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत १ लाख ६२ हजार ३२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१४ जून) दिली आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून भारताने जगभरातील कोरोनाबाधित देशांच्या यादीत चौथ्या क्रमांवर पोहोचला आहे. जगात अमेरिका, ब्राझील, रूस या देशानंतर आता भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत २१, ४२, ६७२ , ब्राजील ८,५०,७९६ , रूस ५, २०, १२९ मध्ये आहेत. तर भारत कोरोना रुग्ण वाढ होणाऱ्या जगातील देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर एक दिवसात सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रासह ५ राज्यांतील नागरिकांना प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

News Desk

कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करावे ! मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

News Desk