HW News Marathi
देश / विदेश

नव्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षासाठी आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक

मुंबई । राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या राज्यातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आज (३० जानेवारी) दिल्लीत पत्रकार परिषद आहे. आता अखेर या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचा नावावर शिक्कामोर्तब होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक महत्त्वाच्या नावांची चर्चा आहे. त्यापैकी, नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. त्याचसोबत, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राजीव सातव हे देखील म्हतत्त्वाचे नेते या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे पक्षाकडून आता नेमकी कोणाला संधी मिळणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, के सी पाडवीसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसला आपल्या प्रदेशाध्यक्षपदासाठी एक आक्रमक आणि सर्वांना घेऊन एकत्र पुढे जाणारा चेहरा हवा असल्याने नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना वायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा!”

News Desk

शेतकऱ्यांना दिलासा ! खतांच्या किंमती पूर्ववत केल्याचं मोदींनी केलं जाहीर, पवारांच्या मागणीला यश?

News Desk

इंटरपोलचे माजी अध्यक्ष हॉंगवेई चौकशीसाठी चीनच्या ताब्यात

News Desk