HW News Marathi
देश / विदेश

PV सिंधू विजयी, भारताला दुसऱ्या दिवशीही यश!

टोक्यो। भारतीय बॅडमिंटणपट्टू PV सिंधू विजयी ठरली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त २९ मिनिटांत पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली आहे.

सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू

बॅडमिंटणपट्टू PV सिंधू ही एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे हे आज तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे. रिओ-ब्राझील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी व्ही सिंधूकडून यावेळीही भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. पी व्ही सिंधू ग्रुप जे मधून खेळत असून यावेळी तिच्यासोबत इस्त्रायलची पोलिकार्पोवा आणि हाँगकाँगची चेऊंग यांचा समावेश आहे. ग्रुपमध्ये सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे.

सुरुवातीला धीम्या गतीने खेळणाऱ्या सिंधूने नंतर मात्र वेग पकडला. दोन्ही गेम्स सहज जिंकत सिंधूने आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये का गणले जात आहोत याची चुणूक दाखवून दिली आहे.

मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन

49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PanchayatiRajDiwas | पंतप्रधानांकडून ‘ई-ग्राम स्वराज्य वेबपोर्टल’चे उद्घाटन

News Desk

…आणि जेव्हा पंतप्रधान मोदी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करतात

News Desk

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात एका दहशतवाद्याचा खात्मा

swarit