HW News Marathi
महाराष्ट्र

नाना पटोले शब्दाला जागणारे ! – लोककलावंत कडूबाई खरात

मुंबई । लोककलावंत कडूबाई खरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबाबत आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. “नाना पटोले यांना आपला संसार उघड्यावर आला असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी मला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. अनेक राजकीय व्यक्ती अशीच आश्वासनं देतात. मात्र नाना पटोले हे थापा मारणाऱ्यांपैकी नसून दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत हे त्यांनी आज दाखवून दिले आहे, याचा खूप आनंद झाला. दोन महिन्यात त्यांनी मला माझ्या हक्काचं घर दिलं”, अशा भावना कडूबाई खरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
नाना पटोले यांच्या उपस्थितीत लोककलावंत कडूबाई खरात यांना हक्काच्या घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “दोन महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात कडुबाईंचा सत्कार करत असताना त्या मला घराबद्दल बोलल्या होत्या, त्यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं होतं की काँग्रेस तुम्हाला घर बांधून देईन. डॉ. बाबासाहेबांचा विचार सांगणाऱ्या कडूबाईंना घर नसेल तर आमचा काही उपयोग नाही. त्याच भावनेतून घर बांधून देण्याचा विचार समोर आला. आज त्यांचा आनंद पाहून माझ्या डोळ्यात आनंदअश्रू आले आहेत. अत्यंत गरीबीची आणि हलाखीची परिस्थिती असतानाही औरंगाबादमध्ये राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांसमोर पोहचवण्याचं महान कार्य करत आहेत”, असं नाना पटोले म्हणाले.
देश वाचवायचाय, संविधान वाचवायचंय!
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवताना कडूबाईंनी कधी पैशाची चिंता केली नाही. उपाशी राहुन बाबासाहेबांचा विचार मांडणारी कडूबाई ही रमाईच आहे. आज काही लोक गरिबांची भाकरी हिरावून घेण्याचं काम करत आहेत, त्याविरोधात बहुजनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेबांचा, बहुजनांचा विचार घेऊन लढाईत उतरायचं आहे. आंबेडकरांच्या विचाराची ताकद ही वंचित, गोरगरिबांसाठी आणखी ताकदीने उभी करायची आहे. देश वाचवायचा आहे, संविधान वाचवायचं आहे. गरिब, वंचित समाज मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत माझा हा संघर्ष सुरुच राहणार आहे”, असं देखील नाना पटोले म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंवर शरसंधान

News Desk

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर

News Desk

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

News Desk