HW News Marathi
महाराष्ट्र

नाना पटोलेंच्या कार्यक्रमात नितीन राऊत अनुपस्थित!

नागपूर | काँग्रेस पक्ष महानगरपालिका निवडणुकांसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. नागपूर महापालिकेवर मागील १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसनं जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच भाग म्हणून नाना पटोले यांनी आढावा बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे नागपूर काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना आता उधाण येत आहे. कारण, नाना पटोले यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत यांची गैरहजेरी दिसून येत आहे.

नितीन राऊतांची गैरहजेरी

नाना पाटोळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये शिबीर पार पडले. यंदा काहीही करुन नागपूर महापालिकेवरचा भाजपचा झेंडा खाली उतरवायचा, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. त्या दृष्टीने काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने नाना पटोले यांनी महत्त्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावली होती. पण या बैठकीला काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते उर्जामंत्री नितीन राऊत गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं होतं.

भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना

विरोधी पक्षाला शह देण्याच्या पूर्ण तयारीत काँग्रेस सरकार आहे. नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात पटोले यांच्या उपस्थितीत आढावा बैठकांचं नियोजन करण्यात आलं होतं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखल्याचं पाहायला मिळालं होतं.

नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात

या बैठकीत बोलताना पटोले यांनी मोठं विधान केलं होतं. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारसाहेब आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे, तुम्हीच शेतकऱ्यांचा विषय सोडवावा- पंकजा मुंडे

News Desk

‘शरद पवारांचा अनादर करणाऱ्या अध्यक्षांची दुकानदारी जनतेसमोर मांडणार’- दिलीप मोहिते पाटील

News Desk

विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

Aprna