HW News Marathi
Covid-19

काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतल्याबद्दल संजय राऊतांनी ‘या’ दोन नेत्यांचे मानले आभार

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी पाच जागांवर विधानपरिषदेची निवडणूक लढवणार आहे. यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोधी होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिला. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भुमिका घेतली. मी प्रदेश अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांचा आभार मानले आहे.

राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्र विधान परिषदेचया नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री ऊधदव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भुमिका घेतली. मी प्रदेश अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व ना.अशोक चव्हाण यांचा आभारी आहे.” विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने दोन उमेवार जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील नाराज असल्याच्या सर्व माहितीवर राऊतांच्या ट्वीन पूर्णविराम लागला आहे.

विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे

  • भाजप – माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे
  • शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे
  • राष्ट्रवादी काँग्रेस – शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी
  • काँग्रेस – राजेश राठोड

विधानपरिषदेतील असे आहे संख्याबळ

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११५ सदस्यांचा पाठिंबा आहेत. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने सेवानिवृत्त!

News Desk

आरोग्यमंत्र्यांची खासगी रुग्णालयात अचानक भेट, चार रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस

News Desk

विनोदी अभिनेता भूषण कडूवर दु:खाचा डोंगर तोसळला, पत्नीचा कोरोनामुळे झाला मृत्यू

News Desk