HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसच्या रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर!

मुंबई। काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होत. काँग्रेसकडून दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता होती, दरम्यान, काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा होती. तर त्यात रजनी पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात होत. मात्र आता अखेर काँग्रेस कडून रजनी पाटील या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

काँग्रेसकडून रजनी पाटील नाव निश्चित

निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशातील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.राजीव सातव यांच्या जागी रजनी पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. राज्यपाल नियुक्त प्रलंबित असलेल्या १२ आमदारांच्या यादीमध्येही त्यांचा समावेश आहे. रजनी पाटील यांच्या रुपाने काँग्रेसने पुन्हा मराठवाड्यातील चेहरा दिला आहे.

एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये रिक्त झालेल्या ६ राज्यसभा जागांच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक आयोगानुसार, त्याची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी झाली आहे.महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसच्या या युवा नेत्याचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता.

भाजपकडून संजय उपाध्याय

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’, नितेश राणेंची आक्रमक भूमिका

Jui Jadhav

‘८० वर्षाचा तरूण योद्धा’ नितेश राणेंच्या शरद पवारांना शुभेच्छा

News Desk

शरद पवार ते अनिल देशमुख ! महाविकासआघाडीच्या या नेत्यांची केलीय Ed, CBI ने कोंडी

swarit