HW News Marathi
Covid-19

काँग्रेस एकाच जागेवर विधानपरिषद निवडणूक लढणार, ‘या’ उमेदवाराचे नाव मागे

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी पाच जागांवर विधानपरिषदेची निवडणूक लढवणार आहे. यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोधी होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिला. काँग्रेसेने राजकिशोर मोदी यांचे नाव विधानपरिषदेच्या निवडणुकीतून नाव मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. आता काँग्रेसकडून फक्त एक उमेदवार म्हणजे राजेश धोंडीराम राठोड हेच विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काल (९ मे) ट्वीट, “प्रदेश काँग्रेसचे सचिव असलेले राजेश राठोड हे काँग्रेस पक्षाचा तरुण चेहरा आहे तर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. हे दोनही उमेदवार बहुमताने विजयी होतील, याची मला खात्री आहे. काँग्रेस पक्ष विधानपरिषदेच्या दोन जागा लढविणार असून श्री राजेश धोंडीराम राठोड आणि श्री राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा करतांना मला आनंद होतो आहे. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!”

विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे

  • भाजप – माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे
  • शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे
  • राष्ट्रवादी काँग्रेस – शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी
  • काँग्रेस – राजेश राठोड

विधानपरिषदेतील असे आहे संख्याबळ

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११५ सदस्यांचा पाठिंबा आहेत. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

 

Related posts

‘तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला निर्देश !

News Desk

दिल्लीमध्ये आजपासून मद्यविक्रीवर लागणार ‘स्पेशल कोरोना फी’ कर

News Desk

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंनी केलं कौतुक

News Desk