HW News Marathi
महाराष्ट्र

गुगल मॅपवर कोरोनाची प्रतिबंधात्मक क्षेत्रं दिसणार

मुंबई | अवघ्या जगाचा डिजीटल वाटाड्या म्हणून ओळख असलेल्या गुगल मॅपवर मुंबईतील कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची अद्ययावत माहिती जाणून घेण्याची सोय आता नागरिकांना उपलब्ध झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित ही सेवा उपलब्ध करुन देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेला गुगलने पूर्ण सहकार्य केले. त्याचा मोबदला घेतलेला नाही. महानगरपालिकेची ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात अवतरली असून त्यामध्ये आणखी नाविण्य आणण्यात येईल. त्याचे महत्त्व पाहता जगातील इतर शहरांनीही आता त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची आणि प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटनेने पाठोपाठ जागतिक बँकेने देखील वाखाणणी केली आहे. या उपाययोजना करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पारदर्शकपणे माहिती पुरवण्यातही बृहन्‍मुंबई महानगरपालिका अग्रभागी आहे. महानगरपालिकेची रुग्णालयं, कोविड सेंटर्स, इतर कामे या सर्वांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शक्य तिथे करण्यात येत आहे. यातून अचूकता, पारदर्शकता राखून वेगवान कार्यवाही करण्यासाठी मदत होते आहे. वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, निरनिराळ्या प्रसारमाध्यमातून, समाजमाध्यमांतून नियमितपणे प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे कोरोना संसर्गाची नेमकी स्थिती काय आहे, तेदेखील नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.

कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. अवाढव्य मुंबई महानगरात अशा प्रतिबंधात्मक क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना ठाऊक असणे, अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन नियमितपणे प्रकाशित करण्यात येते. या संकेतस्थळावर मुंबईतील २४ विभागनिहाय नकाशांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्रदेखील दर्शविण्यात येतात. असे असले, तरी प्रत्येक नागरिकाला एका क्लिकवर आणि सहजसोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, त्याची व्यापकता वाढावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुगल मॅपची मदत घेण्याचे ठरवले. गुगलला देखील ही कल्पना आवडली आणि त्यांनी गुगल मॅपवर या प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखित नकाशे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.

महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून वेळोवेळी पुरवल्या जाणाऱ्या अद्ययावत माहितीनुसार, हे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशे सर्व नागरिकांना पाहता येतील. त्यासाठी मोबाईलवर गुगल मॅप हे अॅप्लीकेशन सुरु केल्यानंतर “कोव्हिड १९ इन्फो” हा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर मुंबई महानगराचा नकाशा “झूम” करुन पाहताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात आणि कोव्हिड 19 कन्टेन्मेंट झोन या उपशीर्षकासह दिसू लागतात. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते. यामुळे आपण नेमके कोठे आहोत, आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे किंवा नाही, असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे, हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे. नुकतीच ही सुविधा सुरु झाली असून त्यामध्ये वेळोवेळी अद्ययावत बदल केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बेबी पेंग्विन’ ने त्रास होत असेल तर ‘वाघ’ म्हणा म्हणजे घराबाहेर पडतील,भाजपचा आदित्यंना टोला

News Desk

“लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं”, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्याना टोला  

News Desk

चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ची बाटली देत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणाला, “यानेही डोकं शांत झालं नाही तर…”

News Desk