HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजपकडून काहींना बडबड करण्याचा ठेका, मात्र आम्ही काडीचीही किंमत देत नाही !

मुंबई | भाजपने काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे. त्यातील एक कंत्राटदार निलेश राणे आहेत. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काडीचीही किंमत देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. निलेश राणे हे वारंवार शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसतात.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. त्या टिकेला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “भाजपने लोकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवाची होळी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था लयाला नेली आहे. याकडे लक्ष जावू नये म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे”, असेही महेश तपासे म्हणाले.

Related posts

‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच !

बीडमधील जनतेचा आगळे-वेगळा उपक्रम, बाहेरुन येणाऱ्यांचे वाजत-गाजत स्वागत करून घरातच क्वारंटाईन

News Desk

सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ आहेत !

News Desk