HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

लातूर | लातूरच्या डॉ. अशोक कुकडे (८० वर्ष) यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. अशोक कुकडे हे विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत. डॉ. कुकडे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. डॉ. कुकडे हे बराच काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संघचालक होते.

बीजे मेडिकल कॉलेज येथे डॉ. कुकडे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीचे आप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेतून त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचे ठरविले. डॉ. अशोक कुकडे यांनी १९६४ साली आरोग्य सेवेसाठी लातूरमध्ये आले. काही काळ खाजगी सेवा दिल्यानंतर त्यांनी ट्रस्ट हॉस्पिटल उभे केले. जे आता विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते.

ग्रामीण भागात त्यांनी कॅन्सर उपचारही अत्यंत कमी दरात देण्यास्तही डॉ. कुकडे यांनी खूप प्रयत्न केले. अखेर त्यांनी कॅन्सर केअर सेंटर उभारले. हे वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय उभारण्यात आलेले देशातील एकमेव कॅन्सर केअर सेंटर आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk

राज्य सरकारने केले ६ हजार २०० लोकांचे पुनर्वसन

News Desk

फडणवीसांनी नियुक्तीला विरोध केलेल्या राजकुमार ढाकणेंची हकालपट्टी

News Desk