HW News Marathi
महाराष्ट्र

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे संशयित रुग्ण, संपूर्ण परिसर सील

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा २०० पार गेला आहे. आता मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे ५ हून अधिक कोरोना संशयित रुग्ण काल (३० मार्च) रात्री आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कोळीवाडाचा संपूर्ण परिसर सील केला असून कोणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने येथे निर्जंतुकीकरण सुरू आहे.

मुंबईतील कोळीवाडा हा प्रचंड दाटीवाटीने लोकवस्ती असलेला संपूर्ण परिसर आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा शक्यात जास्त असल्याने संपूर्ण कोळीवाडा सील केला असून महापालिका प्रशासन सध्या निर्जंतुकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वरळी हा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. या सर्व संशयिताचं वय ५० वर्षांपेक्षा जास्त असल्याचं कळतं. विशेष म्हणजे या संशयितांनी परदेशवारी केली नव्हती किंवा ते कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्याही संपर्कात आले नव्हते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचं कोरोनामुळे निधन …

News Desk

PandharpurElection : फडणवीसांवर इतका अविश्वास दाखवणं बरं नाही, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

News Desk

छायाचित्रकार हा पोलिसांचा तिसरा डोळा – पो. नि. पडवळ 

News Desk