HW News Marathi
देश / विदेश

वुहानमध्ये पुन्हा कोरोचा रुग्णांमध्ये वाढ! वाढली देशवासीयांची चिंता

मुंबई। संपूर्ण जागत चीनच्या वुहान भागातून कोरोना विषाणूचं प्रसारण झालं. या व्हायरसमुळे जगभरात अनेक मृत्यू झाले. तर आता पुन्हा एकदा चीनने सर्व जगाला चिंतेत टाकलंय. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. यामुळे त्याठिकाणी मास टेस्टिंग सुरु केलं आहे.

शनिवारी स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की वुहानच्या 1.2 कोटी लोकसंख्येपैकी 1.1 कोटी लोकसंख्येच्या कोविड चाचण्या झाल्या आहेत, म्हणजेच तिथल्या तब्बल 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

वुहानमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय

वुहानमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. 6 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. यासह, अशी 15 प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत, ज्यात कोणतीही लक्षणं नाही. हुबेई प्रांतात शुक्रवारपर्यंत 47 प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. यापैकी 31 प्रकरणे स्थानिक पातळीवर संक्रमित आहेत. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 64 लक्षणे नसलेल्या रुग्णांना वुहानमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. हुबेई प्रांताच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे उपसंचालक ली यांग यांनी सांगितलं की, शहरात 4 ऑगस्टपासून मास टेस्टिंगला सुरुवात कऱण्यात आल्या होत्या. आतापर्यंत 1.08 कोटीहून अधिक लोकांचे निकालही आले आहेत. यांच्या रिपोर्टसची तपासणी व्यस्त आहेत. शिन्हुआच्या अहवालानुसार, शहरातील 157 निवासी समुदाय शुक्रवारपर्यंत बंद करण्यात आले आहेत.

चीनच्या आरोग्य आयोगाने सांगितले की, शुक्रवारी देशात कोविडचे 139 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत चीनमध्ये कोरोनाची 93,605 प्रकरणं नोंदवली गेलीआणि 4,636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1,444 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 39 रुग्ण असे आहेत ज्यांची प्रकृती गंभीर आहे.

पुण्यात निर्बंध शिथिल

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरातल्या व्यापाऱ्यांनी निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती अखेर आज व्यापार यांच्या मागणीला यश आले. पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील व्यापारी वर्गाने मागील पाच दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तसंच वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुण्यातील दुकानांसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तसंच हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणेकरांना मोठा दिलासा

पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत होती. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. पुण्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तर शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास सर्व शिथिलता मागे घेतली जाणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एटीएम झाले जप्त,पहा…कसलं होतं एटीएम

News Desk

कडू आणि कोसम्बींना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

News Desk

श्रीनगरच्या रुग्णालयातून दहशतवादी फरार

News Desk