नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. मात्र, आता ही दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. जिथे देशात रोज ३ लाखांच्या पुढे नवे रुग्ण आढळत होते ती संख्या अनेक दिवसांनंतर थेट १ लाखांच्या खाली आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ९४,०५२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १,५१,३६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६१४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India reports 94,052 #COVID19 cases, 1,51,367 discharges & 6148 deaths (highest in one day) in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,91,83,121
Total discharges: 2,76,55,493
Death toll: 3,59,676
Active cases: 11,67,952Total vaccination: 23,90,58,360 pic.twitter.com/hS9rDOCDuq
— ANI (@ANI) June 10, 2021
महाराष्ट्रातील स्थिती काय?
राज्यात १०,९८९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन १६,३७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५५,९७,३०४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,६१,८६४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.४५% झाले आहे.
राज्यात आज 10,989 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16,379 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,97,304 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,61,864 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.45% झाले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 9, 2021
लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका, आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी
“लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस नाही. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे,” असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी १२ वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटं वॉकची शिफारस करण्यात आली आहे. अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस करण्यता आलेली नाही. कोरोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जाणं आवश्यक आहे, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाणं आवश्यक आहे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असंही सांगण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.