HW News Marathi
महाराष्ट्र

“वाघ ठरवतो मैत्री कधी करायची”, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

नाशिक | राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात सतत कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात शाब्दिक वाद सुरु असतात. दरम्यन, काल (९ जून) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील असं म्हणाले की वाघाशी मैत्री करायला आम्ही कधीही तयार आहोत कारण दुश्मनी वाघाशी नव्हतीच. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप युतीसाठी जणून काही चंद्रकांत पाटलांनी ऑफरच दिली असं दिसून आलं. आज (१० जून) त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत पत्रकारांशी बोलत असताना असं म्हणाले की, वाघाशी मैत्री केली जात नाही. वाघ ठरवतो मैत्री कधी करायची ते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, आज चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झोपडीधारकांना सदनिकांच्या चाव्या, ताबापत्रांचे वाटप

Aprna

महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपचाच आडमुठेपणा-सचिन सावंत

News Desk

ओबीसी समाजाची जनगणना वेगळी करण्यात व्हावी, छगन भुजबळांची मागणी

swarit