नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासांत 37 हजार 566 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 907 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 566 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 907 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 56 हजार 994 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
India reports 37,566 new #COVID19 cases, 56,994 recoveries, and 907 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 3,03,16,897
Total recoveries: 2,93,66,601
Active cases: 5,52,659
Death toll: 3,97,637 pic.twitter.com/BK1Gi9IHSP— ANI (@ANI) June 29, 2021
डेल्टा प्लसचा चाचणी अहवाल 2 दिवसांत मिळणार, कस्तुरबा रुग्णालयात चाचणी होणार
डेल्टा प्लस विषाणूची चाचणी करण्यासाठी सध्या मुंबईतील नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. तिथून अहवाल येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ चाचण्या करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन दोन आठवड्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळू शकणार आहे.
फेब्रुवारीपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू झाला. या संसर्गाचे प्रमाण आता पूर्णपणे नियंत्रणात येत असताना डेल्टा प्लस रुपी संकट मुंबईवर ओढावले आहे. कोरोनाचे बदललेले स्वरूप असलेल्या डेल्टा प्लसच्या संशयित ६०० रुग्णांचे अहवाल पालिकेला मिळाले आहेत. डेल्टाचा संसर्ग झालेला आतापर्यंत केवळ एक रुग्ण आढळला असून तो बरा झाला आहे. परंतु, खबरदारी म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.