HW News Marathi
Covid-19

“भाजपने मराठा आरक्षणविरोधातील लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली”, काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई | मराठा आरक्षणावरून एकीकडे भाजप ठाकरे सरकारविरोधात मोठया प्रमाणात आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे यावरून आता काँग्रेसकडून भाजपवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. “मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले आहेत. यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का?”, असा संतप्त महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

…तर ‘सुपर स्प्रेडर भाजप’ सर्वस्वी जबाबदार असेल !

“जनतेची दिशाभूल करण्यासाठी ५ जूनला जाहीर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या भाजप पुरस्कृत आंदोलनामुळे जर राज्यात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी ‘सुपर स्प्रेडर भाजप’ जबाबदार असेल”, असाही इशारा यावेळी महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आला आहे. सचिन सावंत याविषयी पुढे भाजपवर आरोप करताना म्हणाले की, “भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे.”

आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न !

सचिन सावंत पुढे असेही म्हणाले की, “भाजपचे केंद्रातील मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट असताना भाजप जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे.”
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ५७ लाखांवर पोहोचली, तर अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख लोकांचा मृत्यू

News Desk

जगभरात आतापर्यंत ४८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, तर १८ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने जनतेला पत्र

News Desk