नवी दिल्ली | संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासात भारतात 48 हजार 786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1005 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब अशी आहे की, 24 तासात 61 हजार 588 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 4 लाख 11 हजार 634 वर गेला आहे.
देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 88 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 99 हजार 459 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 23 हजार 257 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 33 कोटी 57 लाख 16 हजार 19 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 48,786
देशात 24 तासात डिस्चार्ज – 61,588
देशात 24 तासात मृत्यू – 1,005
एकूण रूग्ण – 3,04,11,634
एकूण डिस्चार्ज – 2,94,88,918
एकूण मृत्यू – 3,99,459
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,23,257
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 33,57,16,019
India reports 48,786 new #COVID19 cases, 61,588 recoveries, and 1,005 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 3,04,11,634
Total recoveries: 2,94,88,918
Active cases: 5,23,257
Death toll: 3,99,459Total Vaccination : 33,57,16,019 pic.twitter.com/o1FX1g1Xue
— ANI (@ANI) July 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.