Lमुंबई | राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. मागील तीन दिवसातील दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्या वर आढळून आल्यानंतर, आज (१ मार्च) यामध्ये काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले.
शिवाय कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्येत देखील वाढ दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३९७ नवीन रूग्ण आढळून आले, तर ५ हजार ७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. याशिवाय राज्यात आज ३० रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९३.९४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के आहे.
Maharashtra reported 6,397 new COVID-19 cases, 5,754 recoveries, and 30 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 21,61,467
Total recoveries: 20,30,458
Death toll: 52,184
Active cases: 77,618 pic.twitter.com/BiWCT9gDqD— ANI (@ANI) March 1, 2021