HW News Marathi
Covid-19

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार आढळला!

ब्रिटन | दक्षिण आफ्रिकेतील कोविड १९ विषाणूशी संबंधित असलेला विषाणूचा आणखी एक प्रकार ब्रिटनमध्ये सापडला असल्याचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी जाहीर केले. याआधी कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडलेला असतानाच आता हा प्रकार सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार सापडलेले नवीन स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या ज्या दोन केसेस आहेत, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून प्रवास केला आहे. दक्षिण आफ्रिकेची सतर्कता आणि पारदर्शकतेबाबत आम्ही आभारी आहोत. त्यामुळेच नवीन स्ट्रेनबाबत माहिती मिळाली, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या दोन बाधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कुठल्याही व्यक्तीशी संपर्कात आलेल्या सर्व ब्रिटनच्या रहिवाशांनाही क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत संशोधन केलं जात आहे.

लंडनहून दिल्लीत आलेल्या विमानातील पाच प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकूण 266 प्रवाशी त्या विमानात होते. विशेष म्हणजे इंग्लंडमध्येच कोरोनाचा घातक विषाणू सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महानगरपालिकेकडून ‘फेसमास्क’ न वापरणा-यांकडून एका दिवसात ३२ लाखांची दंड वसुली रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, क्लब, जिमखाना इत्यादींमध्येही धडक कारवाई

News Desk

पुढच्या महिन्यात एका दिवसात ४ ते ५ लाख कोरोना रुग्ण येण्याचा अंदाज..?

News Desk

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ हजारांच्या पार, मृत्यूंच्या संख्येनेही ओलांडला एक हजाराचा टप्पा

News Desk