HW News Marathi
देश / विदेश

दिलासादायक ! केरळमध्ये ‘कोरोना’मुक्त होणाऱ्यांचा आकडा जास्त

मुंबई | आपला संपूर्ण देश हा सध्या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तासागणिक वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा ही आपल्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. असे असले तरीही देशभरातून अनेक दिलासादायक बातम्या देखील समोर येत आहेत. अशीच एक दिलासादायक गोष्ट म्हणजे केरळमधील कोरोनाबाधितांचा आकड्यात आता घट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या एका आठवड्यात केरळमधील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होताना दिसून येत आहे. केरळमध्ये कोरोनावर उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निश्चितच ही अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात संपूर्ण देशात कोरोनाची सर्वाधिक झळ बसणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह केरळचाही समावेश होता. आता मात्र केरळमधील स्थिती हळूहळू सुधारत आहे. आताच्या घडीला केरळमध्ये ३७६ कोरोनाबाधित आहेत. तर तब्बल १७९ रुग्ण हे आता पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. महाराष्ट्रात मात्र दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २००० पार गेला आहे. त्यामुळे राज्याची चिंता जरी वाढली असली तरीही राज्यात टेस्ट्सचे प्रमाण देखील वाढले आहे, हे देखील महत्त्वाचे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण संपूर्ण देशाचा विचार केला तर सध्या देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९३५२ एवढी झाली आहे. आतापर्यंत यांपैकी ३२४ जणांचा मृत्यू झालाय, तर ९८० रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा मोठा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ नोटीसला अभ्यास करून उत्तर देणार !

Gauri Tilekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार

News Desk

कर्नाटकातील आमदारांचा गोव्याला जाण्याचा प्लॅन रद्द

News Desk