HW News Marathi
Covid-19

चांगली बातमी ! राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट

मुंबई । राज्यासमोर कोरोना संकटाचे मोठे आव्हान आहे. अनेक जिल्हे बाधित असल्याने शासन प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र, गेल्या २४ तासांतील राज्यातील कोरोनाविषयीची आकडेवारी दिलासादायक आहे. गेले अनेक दिवस सातत्याने 60 ते 65 हजारांच्या पुढेच असणारा आकडा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (7 मे) जारी झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 54 हजार 22 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे.

तुलनेने हा आकडा खूप कमी असून गुरुवारी (6 मे) राज्यात एकाच दिवसांत 62 हजार 194 कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. राज्यासाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, याच एका दिवसात राज्यात नवीन 37 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, हा आकडा अजूनही कोरोनाबाधितांच्या आकड्यापेक्षा कमीच आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 6 लाख 54 हजार 788 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.36% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

News Desk

“पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला धमकी देतात?”

News Desk

कंटेन्मेंट झोनमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी

News Desk