HW News Marathi
Covid-19

अमेरिकेत इतर देशांच्या तुलनेत ५ दशलक्षाहून सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या, ट्रम्प यांची माहिती

न्यूयॉर्क | जभरात कोरोनाने फैमान खातला आहे. तर अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून अमेरिकेत गेल्या २४ तासात कोरोनामुळे २ हजार ४९४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी एएफपी वृत्तसंस्थेने जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ दशलक्षाहून अधिक लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. जगातील कोरोनाने ग्रस्त असलेल्या देशांच्या तुलनेत जास्त आहेत, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून दिली आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1254061979607711745?s=20

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५२ हजारांवर पोहोचला आहे. कोरोनाचा अमेरिकेत वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता ट्रम्प यांनी दररोजची कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद येथून पुढे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ट्रम्प प्रशासन आरोग्य सचिव एलेक्स अजर यांना हटवण्याची चर्चा सुरू आहे. कोविड १९ म्हणजे करोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लशी मिळून एकूण ७२ घटकांवर चाचण्या सुरू असून २११ घटक हे कोविड १९ उपचारातील नियोजन पातळीवर आहेत, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1254168730898173953?s=20

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकच्या दुर्घटनेला भाजप जबाबदार ! राजकारणाला सुरूवात

News Desk

बीडच्या केजमधील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा आज औरंगाबादेत मृत्यू

News Desk

जगात कोरोना रुग्णांची संख्या ७३ लाखांवर पोहोचली, तर ४ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

News Desk