HW News Marathi
महाराष्ट्र

नगरमधील ते पॉझिटिव्ह ६ जण मरकजच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी

अहमदनगर | कोरोनाबाधितांचा राज्यातला आकडा तासागणिक वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज (२ एप्रिल) आणखी ६ रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील २ जण हे परदेशातील नागरिक असून दिल्लीतील ‘मरकज’मध्ये त्यांचा सहभाग होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगरच्या आरोग्य विभागाने काही संशयित रुग्णांच्या घशाचे स्त्राव पुण्यात तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील ५१ रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून त्यातील ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

तर, ४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या ६ जणांपैकी १ रुग्ण इंडोनेशियाचा आहे तर दुसरा जिबुटीचा नागरिक आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्या मुकुंदनगर भागातील २ व संगमनेर भागातील २, अशा ४ नागरिकांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाची लागम झालेल्यांची एकूण संख्या १४ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

अहमदनगरमधील एकूण रुग्णांपैकी ७ व्यक्तींना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामूळे सद्यस्थितीला राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा हा ३४१ वर पोहोचला आहे. दिवसेंदिवस ही बाब चिंताजनक होत चालली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे; दीपक केसरकरांची पत्रकार परिषदेत माहिती

Aprna

मनसेची तिसरी यादी, बाळा नांदगावकर यांना उमेदवारीच नाही

News Desk

“या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही होणार?”, फडणवीसांचा पवारांना सवाल

News Desk