HW News Marathi
महाराष्ट्र

“या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही होणार?”, फडणवीसांचा पवारांना सवाल

नागपूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही चौकशी होणार आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जोपर्यंत देशमुख यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.

दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन थेट पवारांनाच सवाल केले आहेत. ज्युलिओ रिबेरो चांगले अधिकारी आहेत. हे हुशार आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल करतानाच केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे की देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. त्याचा खुलासा पवारांनी करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत. ते पदावर असेपर्यंत त्यांची चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करण्यात यावी, जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.वाझेंची नियुक्ती सिंग यांनी केल्याचं पवारांनी सांगितलं. ते खरं आहे. पवारांनी सत्य सांगितलं. पण ते अर्धसत्य आहे. सिंग यांच्या समितीनेच वाझे यांना पदावर घेतलं. मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतरच त्यांनी वाझे यांना पदावर घेतलं होतं. हे सत्य असून पवारांनी हे सत्य सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

सचिन वाझेंकडे आलिशान गाड्या सापडल्या आहेत. गेल्या सहा-आठ महिन्यात या गाड्या कोण कोण मोठे लोक वापरत होते, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.परमबीर सिंग यांची बदली झाल्याने त्यांनी आरोप केल्याचं पवार म्हणत आहे. परंतु या आधी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आरोप केले होते, त्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. सुबोध जैस्वाल यांनी बदल्यांच्या रॅकेटबाबत सरकारला अहवाल दिला आहे. त्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकसह सहा कर्मचा-यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी

News Desk

कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

News Desk

सिंधुदुर्गात जमावबंदी असतांना नारायण राणें जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार!

News Desk