HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांचा आकडा ९७ वर

महाराष्ट्र | कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच चालली आहे. सध्या मुंबईत ३, साताऱ्यात १ आणि सांगलीत ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा ९७ वर गेला आहे. दरम्यान, सांगलीमधील कोरोनाबाधित हे सौदी अरेबियावरुन आले होते. हे चौघेजण इस्लामपूर येथील असून त्यांनी हजची यात्रा केली होती. साताऱ्यात कोरोना बाधित महिला असून त्यांचे वय ४५ वर्ष आहे. तर, सांगलीतील ४ कोरोना बाधित हे २ पुरुष आणि २ महिला आहेत. साताऱ्यात काल (२२ मार्च) विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलाचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड- 19 बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.

या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास १५ वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थित आहे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. काल (२३ मार्च) राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या तर आजपासून जिल्ह्यांच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच आंतरराज्यीय विमान सेवाही आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे.

जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहणार आहे. सर्व प्रार्थना स्थळे, मंदिरे बंद राहमार आहेत. तसेच, जे कोरोनाबाधित आहेत त्यांनी आणि जे नाही आहेत त्यांनी सगळ्यांनीच काळजी घेण गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिवसेंदिवस राज्याची परिस्थिती ही बिकटच होत चाचली आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात ठाकरे सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्याचे काटेकोरपणे सगळ्यांनी पालन करायलाच हे आहे. कोरोनाशी दोन हात करायचा असल्यास तो घरात राहूनच करावा लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार – नाना पटोले

News Desk

‘म्याव म्याव’ करणारे लपून बसलेत, दीपक केसरकर यांचे नितेश राणेंवर टीकास्त्र

Aprna

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Manasi Devkar