HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात एकही वर्तमानपत्र प्रसिद्ध होणार नाही

पुणे | कोरोनासंदर्भात पुण्यात शहरी वाहतूक तर बंद केली होतीच पण आता २४ ते ३१ मार्चपर्यंत एकही वर्तमानपत्र प्रसिद्ध होणार नाही आहे. फक्त ई-पेपर उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, घरोघरी पेपर वाटायला जाणेही हानिकारक असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच, मुंबई-पुणे नवा आणि जुना हा देखील बंद करण्यात आला आहे.

तसेच, २ दिवस मुंबईत कोणतेही वृत्तपत्र निघणार नाही आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय घेतला. तसेच, मुंबईच ही यानंतर वृत्तपत्र काढायचे की नाही याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येणार असल्याची माहीती युनायटेड फोरम आँफ न्यूज पेपर संस्थेने दिली आहे. दरम्यान, लोकांना आता सगळ्या बातम्या या डिजीटल माध्यमांतून वाचाव्या लागणार आहेत. सद्यस्थितीला पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ही १६ असून महाराष्ट्राचा आकडा हा ९३ वर गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk

ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

Aprna

मान्सूनची ‘नांदी’ तरी पाणी‘बंदी’, हे संकट भयंकर !

News Desk