HW News Marathi
महाराष्ट्र

नालासोपाऱ्यातील ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णाने स्वत: हून महापौरांना दिली माहिती

नालासोपारा | कोरोनाचाचा प्रादुर्भाव अपेक्षेपेक्षा अधिक होत चालला आहे. वसई-विरार नंतर आता नालासोपाऱ्यात ही कोरोनाचा १ रुग्ण आढळला आहे. ५५ वर्षांचा हा रुग्ण असून नालासोपाऱ्यातील निळेमोरे गावात राहत आहेत. या रुग्णाला तातडीने मुंबईच्या जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामूळे वसई-विरारमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर पोहोचली आहे. हा कोरोनाबाधित रुग्ण जे.जे रुग्णालयात राम करत होता. तसेच, कोरोनाचे रुग्ण ज्या विभागात उपचार घेत होते त्या परिसरात त्याचा वावर असायचा.

रुग्णाच्या कुटुंबातील ३ जणांना चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्वत: हून रुग्णाने ही माहिती दिल्याचे महापौर प्रविण शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, या रुग्णाच्या घराजवळ आरोग्य पथक पाहणी करत असून लवकरच त्या परिसरात औषध फवारणी करणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. तर या रुग्णाच्या घराच्या आसपास महापालिकेच आरोग्य पथक जावून पाहणी करणार आहे. तर लवकरत या परिसरात देखील औषध फवारणी करणार असल्याचही महापौरांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार

News Desk

निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार! – देवेंद्र फडणवीस

Aprna

“उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Aprna