HW News Marathi
देश / विदेश

कोरोनाचा विळखा ! मुंबईतील ३ डॉक्टर्स, २६ नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | संपूर्ण जग कोरोनाशी संघर्ष करत आहे. आपल्याही देशात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थिती अत्यंत गंभीर आहे. एकीकडे देशातील आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०६७ तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडा ७८१ वर जाऊन पोहोचला आहे. त्यातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा धोका सध्या चांगलाच वाढला आहे. त्यात मुंबईसाठी आणखी धक्कादायक बाब म्हणजे वोकार्ड रुग्णालयामध्ये चक्क ३ डॉक्टर्स आणि २६ नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या रुग्णालय तात्पुरते सील करण्यात आले आहे. याप्रकारामुळे सध्या परिसरात खळबळ उडाली आहे.

कोरोनामुळे संसर्ग आणखी वाढू नये म्हणून केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता बाकी संपूर्ण देश सध्या लॉकडाऊन आहे. जगभरातील डॉक्टर्स आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ या लढाईत अग्रक्रमावरून राहून कोरोनाशी दोन हात करत आहे. मात्र, आपल्याला अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांपैकी डॉक्टर्स आणि नर्सेसना होणाऱ्या कोरोनासंसर्गाच्या वृत्तांनंतर चिंतेत आणखी वाढ झाली. मुंबईतील वोकार्ड रुग्णालयाच्या या इमारतीमध्ये सध्या कोणाला प्रवेश दिला जात नाहीये. त्याचप्रमाणे, तेथे आधीपासूनच दाखल असणाऱ्या सर्व रुग्ण, नर्सेस आणि अन्य मेडिकल स्टाफचे दोन्ही रिपोर्ट जोरपर्यंत कोरोना निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत त्यांना तिथेच ठेवला जाणार असल्याची माहिती मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवसेना’ काढताना वंशंजांना विचारलं होतं का, ‘शिवसेना नको आता ठाकरे सेना करा’ उदयनराजेंचं सेनेला चॅलेंज….

Arati More

चीनची घाबरगुंटी; डोकलाममधून माघार

News Desk

पाकिस्तानमध्ये ४० दहशतवादी संघटना सक्रिय, इम्रान खानचा गौप्यस्फोट

News Desk