HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात कोरोना चाचण्यांचा दर प्रति तपासणी ३०० रुपये कमी केला – राजेश टोपे

मुंबई | राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभमीवर चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील चाचणीच्या दरांबद्दल त्यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत.आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टीग त्याकरीता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येणार आहे. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

Related posts

महाराष्ट्रात आज ३००७ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

आमदार पुत्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी देवीचा दुग्धाभिषेक व महापूजा केली जातेय 

News Desk

#MaharashtraElections2019 : पहिल्या २ तासातील मतदानाची टक्केवारी

News Desk