नवी मुंबई | मुंबई पाठोपाठ नवी मुंबईत देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्शवभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज (४ जुलै) नवी मुंबई आणि पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले.
कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे. टेस्टिंग वाढवली नाही तर कोरोनाचे संक्रमण वाढत जाईल. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
तसेच सध्या डबलिंग रेट २४ दिवसांवर गेला असला तरी संख्या वाढत चालली आहे. आता रुग्णांना शासकीय रुग्णालयात जागा उरली नाही आहे, त्यामुळे खासगी रुग्णालांमध्ये जावे लागते आणि तो खर्च परवडणारा नाही आहे. लागतं आणि ते न परवडणारं आहे. काम पटापट झाली पाहिजेत, पण ती कामं वेगानं होत नाहीत, असेही फडणवीस म्हणाले. तसेच, वाशी बाजार समितीमध्ये रॅपिड टेस्टींग झाली पाहिजे. थर्मल टेस्टींग वाढले पाहिजे, अशी सूचनाही यावेळी त्यांनी दिली.
We need to create more facilities & proper coordination with private healthcare facilities.
This is exceptional time &all our efforts should aim towards saving lives.
LoP @mipravindarekar too joined me for all the visits today.
My media interaction at Panvel hospital. pic.twitter.com/zQmaF0HwfF— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.