HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

मुंबई | संपुर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरदार सुरु आहे. या कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात सध्या अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखले आहे. तर राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची माहिती ट्विट केली आहे. “राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल यंत्रणेचे अभिनंदन”, असं राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Related posts

शरद पवार होणं कुणाचंही काम नाही!

News Desk

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा १ जवान शहीद, १ जखमी

News Desk

शरीफच्या जागी शाहिद

News Desk